Shree Guru Pasayadan गुरु पसायदान


 ।। पसायदान ॥

स्वामी देई हेचि दान ।। नित्य चरणाचे दर्शन || १ || 

मज नको धन दारा । तुझ्या चरणि द्यावा थारा || २ || 

मज ठेवावे भीकारी । सुखे करीन चाकरी ||३|| 

तुझे नाम माझि जोड । मुखी राहो तेचि गोड || ४ || 

तुझ्या चरणी माझा माथा । ऐसे करी दिनानाथा || ५ || 

तुझ्या नामी लागो छंद । मज द्यावे दास पद || ६ || 

सूत मागे हेचि दान । तुझ्या चरणी होउ लिन || ७ ||


।। अपराध क्षमा ।। 

अपराध क्षमा आता केला पाहिजे । 

गुरु हा केला पाहिजे । 

अबध्द सुबध्द गुण वर्णीयले तुझे ।।धृ।0। 

न कळेची टाळ वीणा वाजला कैसा । 

गुरु हा वाजला कैसा ।।

अस्ताव्यस्त पडेनाद गेला भल तैसा ।।

नाही ताल, ज्ञान नाही कंठ सुस्वर ।

गुरु हा कंठ सुस्वर झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ।। 

निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे । 

गुरु हे वेडे वाकुडे ।

गुण दोष न लावावा सेवकाकडे ।।


Samarth Bhajan

|| भजन ||


समर्थभजनीं वय घालवा हो । समर्थभजनीं वय घालवा हो । 

समर्थभजनीं वय घालवा हो । समर्थभजनीं वय घालवा हो ।


    

Shree Guru Pasayadan गुरु पसायदान Shree Guru Pasayadan गुरु पसायदान Reviewed by General Information on ऑगस्ट १२, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.