Shree Dattanchi Aarti दत्ताची आरती


   

श्रीदत्ताची आरती 



त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। 
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । 
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥ 
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
 
  जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
 
 सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । 
 अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥ 
 पराही परतली तेथे कैचा हेत । 
 जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
 
 दत्त येऊनिया ऊभा ठाकला । 
 भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ 
 प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । 
 जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ 

 दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । 
 हरपले मन झाले उन्मन ॥ 
 मी तू पणाची झाली बोळवण । 
 एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
 
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
 





श्री दत्तात्रेयांची आरती
 
जय अनसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता।
सिद्ध मुकुटमणी ब्रह्मज्ञानी सुरनरभ्रमहर्ता ।। धृ।।

मदनमनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता । 
चरणी पादुका कटी मेखला जटामुकुट माथा ॥ १॥
 
पुराण पुरुषोत्तम त्वा धरिले अगणित अवतारा । 
श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दातारा ॥ २॥
 
मूढमती अति पतित दीन परी आलो शरण तुला । 
कृपामृते निजस्वरुपे रमवूनी उद्धरी दासाला ॥ ३॥ 





Shree Dattanchi Aarti दत्ताची आरती  Shree Dattanchi Aarti दत्ताची आरती Reviewed by General Information on जुलै २६, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.