।। श्री दत्तात्रेय स्तोत्र ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
ध्यानमंत्र
ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी: साक्षिभूतम् ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ॥
काषायवस्त्रं करदंडधारिणं ।
कमंडलुं पद्मकरेण शंखम् ।।
चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं ।
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
॥ श्री गणेशाय नमः ।।
।। अथ श्री दत्तस्तुतीप्रारंभः ।।
ध्यान
धृत्वा कमंडलुं करे दरटंकमालिकाम् ।।
कौपीन- मौंजि- भुज-शास्त्र- मुखत्रिकेशवं ।।
नित्यं हि वास अवदुंबर- छायिं श्रीहरे ।।
दत्तात्रेय शरणं मां भवपारकारक ।।
॥ श्री दत्तस्तुती ।।
यतीरूप दत्तात्रया दंडधारी । पदीं पादुका शोभती सौख्यकारी ।।
दयासिंधु ज्याचीं पदें दुःखहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||१||
पढ़ें पुष्करा लाजविती जयाची । मुखाच्या प्रभें चंद्र मोहनि याची ।।
घडो वास येथें सदा निर्विकारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||२||
सुनीटा असती पोटऱ्या गुल्फ जानू । कटीं मौंजि कौपीन ते काय वानूं ।।
गळां मालिका ब्रह्मासूत्रासि धारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||३||
गळां वासुकीभूषणें रुंडमाळा । टिळा कस्तुरी केशरी गंध भाळा ||
जयाची प्रभा कोटिसूर्यासि हारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥४॥
जटाभार माथा प्रभा कुंडलांची । त्रयास्यें भुजा शास्त्र सायूध साची ।
त्रिशुळमाळादिक छाटिधारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||५||
कली पातला पातका वाढवाया । तयानें जनां मोहिलें गाढ वायां ।।
जगी अवतरें दुःखहारा असुरारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥६॥
कि अनूसयासत्त्व हारावयासी । काम त्रिमूर्ति जातां करि बाळ त्यांसी ॥
निजे पालखीं सर्वदा सौख्यकारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥७॥
प्रसिद्धा असती क्षेत्र तीर्थे तयांचा कली पातल्या जाहला लोप साचा ।।
करी तत्प्रसिद्धी मिषें ब्रह्मचारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||८||
मुखें वेद नीचाचिया बोलवीले । श्रिशैल्या क्षणें तंतुकालागिं नेलें ।।
सुदेही करी विप्रकुष्ठा निवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।९।।
दरिद्रे बहू कष्टला विप्र त्यासी । क्षणे द्रव्य देऊनि संषोषवीसी ।।
दिला पुत्र वंध्या असुनी वृध्द नारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||१०|
मनीं इच्छि विप्रैक व्हाया अन्नदान । असें जाणुनी कौतुका दावि पूर्ण ।।
करी तृप्त लेशान्निं जो वर्ण जारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥। ११॥
विलोकूनिया शूद्रभक्ती मनीं ती । कृपें दीधलें पीक अत्यंत शेती ।।
करी काशियात्रा कुमारा अधारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१२।।
नृपस्थानिं रंकासही स्थापियेलें । मदें व्यापिले प्रिय निर्गर्व केले ||
कृपादृष्टिनें स्फोटकातें निवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||१३||
द्विजाच्या घरी घेवडा वेल ज्यानें । मुळापासुनी तोडिला तो तयानें ।।
दिली संतती संपदा दु:खहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१४।।
शुष्कासुनी काष्ठही वृक्ष केला । गतप्राण तो पुत्र सजीव केला ।।
औदुंबरी आवडे वास भारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१५।।
त्रिलोकीं अशी कीर्ति केली अगण्य । अगम्यागमा ख्याति ही ज्याचि धन्य ॥
स्मरें भक्तिनें तद्भवदु:खहारी । तुम्हांवीण दत्ता मैला कोण तारी ||१६||
अनंतावधी जाहले आवतार परी श्रीगुरुदत्त सर्वांत थोर ।।
त्वरें कामना कामिकां पूर्णकारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||१७||
तपें तीर्थ दानें जपादी करीती । स्वहीतार्थ ते दैवताला स्तवीती ॥
परी केलिं कर्मे वृथा होति सारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||१८||
सदा आससी दत्त सर्वार्थकामा । त्वरें भेटसी टाकुनी सर्वकामा ॥
मना माझिया आवरी दैन्य हारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१९।।
मनीं आवडी गायनाची प्रभूला । करी सुस्वरें नित्य जो गायनाला ।।
तयाच्या त्वरे संकटांतें निवारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २०॥
असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते प्रभातीं करी स्नान गंगातिरी तें ।।
करी कर्विरीं अह्नि भिक्षार्थ फेरी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२१।।
निशी जाय निद्रार्थ मातापुरासी । सर्वे कामधेनू वसे तेजराशी ।।
तसे श्वानरूपी सर्वे वेद चारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||२२||
जनां मुक्तिचा मार्ग दावावयासी । कळाया स्वरूपप्रचीती तयांसी ।।
त्रिलोकीं करी जो निमिषार्ध फेरी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||२३||
असें रूप ठावें तुझें आसतांना । वृथा हिंडलों दैवतें तीर्थ नाना ।
परि शेवटीं पायिं आलो भवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||२४||
जगीं जन्मलों नेणुं दुःखासुखाला । अयुर्दाय अज्ञानिं तो व्यर्थ गेला ॥
कळू लागतां खेळलों खेळ भारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||२५||
तृतीयांश आयुष्य ऐसेंचि गेलें । परी नाहिं त्वन्नाम मीं आठविलें ॥
अतां यौवन प्राप्त झालें अपारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||२६||
परद्रव्य कांता पराची पहातां । स्मरादी रिपू ओढिती मानसाऽतां ।।
कसा घ्यावं तूर्ते मधुकैटभारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥। २७।।
पुढें वृद्धता प्राप्त होईल वाटे । तिच्या यातना देखतां चित्त फाटे ।।
कधीं भेटसी केविं हो चक्रधारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२८।।
अनुष्यार्घ निद्रार्णवामाजि गेलें । पणा तीन शेषांत ते जाण केले ।।
तयांनी मना गोविलें दुःख भारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२९।।
अशा घोर मायासमुद्रा पहातां । भिवानी पद पातलों तूमच्याऽतां ।।
तरी क्लेशचिंतादि दुःखासि हारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||३०||
त्यज्या मत्त पाखंड ते सज्जनाहो । धरा मानसीं भक्ती निष्ठा दृढा हो ।।
भवांबूधिच्या नेई तो पैलपारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।। ३१ ।।
स्वतां घेतला दाखला सद्गुरूचा । तसा घेति ते आणि घेतील साचा ।
मन:कामना होतसे पूर्ण सारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||३२||
करी पाठ जो कां स्तुती ही त्रिकाळा । तयाच्या प्रतापें पडे भीति काळा ।।
गुरू यर्च दारिदुःखां निवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||३३||
काया व्यर्थ तपादी यज्ञिं हवनीं स्वाध्यायिं तीर्थाटनीं ।
शास्त्राच्या पठनीं जनीं वनिं गिरी घोरांदरी जाउनी ।
अज्ञानें भिवुनी अरीसि नयनी काळासही पाहुनी ।
द्ववैणाक्षर 'दत्त' घ्या तरि
सुखी कां शीणवावी कुणी ।।१।। संपूर्णा ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: