Shree swami Samarth Path

 Swamisut Virchit Swam Path


॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ०१ ॥


'श्रीस्वामीसमर्थ' नाम हे शोभत ।
नमू भगवंत-मोक्षदाता ।। 
स्वानंदाची मूर्ती आनंदाची वृत्ती । 
विराजे' ही दीप्ती' समर्थाची ।।
मिथ्या दुजा शीण तव नामावीण ।
ध्याता हे चरण, सर्व सिद्धी ॥
समर्थ तू एक द्यावयासी सुख । 
तारिले अनेक जड-मूढ ।।
जगी तुझे पद तारक हे बंद्य । 
त्यांचा हा आमोद', आम्ही सेबू || 
यज्ञ नको याग, तप आणि योग । 
नामाच्या सवेग चारी मुक्ती' ।। 
जप तव नामी, कलियुगी स्वामी । 
आणि ध्यान कामी येत असे ।। 
यथार्थ तराया सर्व सोय राया । 
भावे तव पाया ध्याता होय ।। 
स्वानुभवे' पाहता तुजला समर्था । 
नुरे भव-व्यथा काही एक ।। 
भीती नसे काही, शोधिता न ठाई। 
पडशी तू आई, भक्तिविणे ।। 
समर्थ तू स्वामी, सुता निजधामी । 
कृपावंता तुम्ही, सदा ठेवा ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ०२ ।।


आनंदाची मूर्ती परमानंद चित्ती । 
पाहता विश्रांती, स्वामीरूप ॥ 
स्वामीरूप पाहता गेली भव- चिंता' । 
दूर केली व्यथा, कृपाबळे | 
कृपाबळे ज्याणे आनंदाचे लेणे' । 
लेवविले', उणे काही नसे ॥ 
काही नसे कोठे, अन्य सर्व खोटे । 
जगी नाम मोठे समर्थाचे ॥ 
मोठे समर्थाचे नाम हेच साचे । 
आणि रूप ह्याचे चित्ती ठेवा ॥ 
चित्ती ठेवा तुम्ही दर्शन हे कामी । 
स्वामीसुत स्वामी-पायी लोळे ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ०३ ॥


स्वामीनाम मुखी तोचि एक सुखी । धन्य तिही लोकी' जन्मोनिया ||
स्वामीचरणी ध्यास असे ज्या प्राण्यास ।सुखाब्धीचा' वास तया ठायी ॥
हाचि स्वामीपाठ, भक्तिभावे नीट ।करिताची पाठ, सुख होय ||
म्हणे स्वामीसुत भजावा समर्थ । भावे हो यथार्थ सुखासाठी ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ०४ ॥


नाम हे स्वामीचे निरंतर वाचे । गाता होत त्याचे सर्व कार्य ॥ 
स्वामीनाम गोड, धरूनी आवड । घेता होय मोड', दुष्कृत्याची' ।। 
घ्या हो स्वामीनाम, घ्या हो स्वामीनाम । तेणे मिळे धाम', तया पायी ॥
स्वामीसुत म्हणे स्वामीनाम घेणे । सफळ हे जिणे, येणे होय ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ०५ ॥


स्वामीनाम मोठे अन्य सर्व खोटे । स्मरलिया कोठे भय नाही ।। 
करा त्याचा जप' नका करू तप । काही नसे खप' साधनांचा || 
पंचदशाक्षरी', जपी भाव धरी । चित्त स्वामीवरी ठेवोनिया ||
त्यासी तरणोपाय सहजची होय । मागे-पुढे भय काही नसे ॥ 
म्हणे स्वामीसुत, करा हें यथार्थ । असे मोक्ष सत्य तया पायी ।।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ०६ ॥


अवतार सगुण तारक निधान । परब्रह्म पूर्ण स्वामी माझा ॥
भावे नाम नर' जपता भव- पार ।
होईल, निर्धार' ऐसा असे ।।
कोठे ते आणिक, नसे बाबा सुख ।
असे तेचि एक चरणांबुजी'।
स्वामीसुत म्हणे, स्वामीनामाविणे । तरूनिया जाणे नव्हे कधी ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ०७ ॥


वेद तेचि चार, पुराणे साचार । अठरांचा विचार जयामाजी ॥
स्वामीनाम तेच, चुकवाया पेच'। जगामाजी साच उद्भवले' ।। 
तेच तुम्ही घ्यावे, तरूनिया जावे। निरंतर पाहावे स्वामीरूप ।। 
तरावया भव, असे स्वामी'नाव' । गाता होई साव, तिही लोकी ॥
स्वामीसुत म्हणे चोहोंचे' हे गाणे । सहा' - अठरा ' लेणे, तेची लेती ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ०८ ॥


स्वामीनाम बोला, स्वामीनाम बोला । अनुदिन' घोळा वाचे तेचि ॥ 
असे नामी सुख, नाम हे तारक । पुण्याचा' हा लेख' कोण करी ॥ 
भजा स्वामीराणा, भजा स्वामीराणा ।
कैवल्याचा' जाणा 'दाता' तोचि ।।
नाम असे नामी कलियुगी' कामी । स्वामीसुत 'स्वामीनाम' जपे ।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ०९ ।।


नाम ऐसे थोर असे हो साचार ।
जपा निरंतर' तेच तुम्ही ।।
नाम जपलिया नसे 'ठाव' भया । चित्त स्वामीपायांवरी ठेवा ।।
खटाटोप खोटी, टाकूनिया पाठी ।
भजा जगजेठी स्वामीराव ||
स्वामीनाम थोर, जपा वारंवार । सांगतसे सार स्वामीसुत ||


॥ श्रीस्वामीपाठ : अभंग १० ॥


स्वामीचरणी भाव ठेविता वैभव । मिळे मुक्ति सर्व अनायासे' ।। 
हेचि आता करा चरणी भाव' धरा । चुकवावया फेरा चौऱ्यांशीचा' ।। 
नाही तरी व्यर्थ दवडाल स्वार्थ' । न साधेची अर्थ, स्वामीविण ॥ 
'स्वामी- स्वामी' नाम, गाता साधे काम ।चरणी निजधाम', स्वामीसुता ।।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ११ ॥

स्वामीनामी सुख, नाम हे तारक । नामाविण देख सर्व खोटे ।। 
सर्व खोटे आता नामाविण पाहता । मिथ्या' सर्व वार्ता सोडी तू बा ।। 
तू सोडी तू बा सत्य नाम नसे जेथ । नसे ज्या कुळांत ज्याचे मुखी ।। 
ज्याचे मुखी नाही भजन हे पाही । करूनी भंडाई' फुका' गेला ।। 
फुका गेला जन्म, वाया हा अधम । विसरूनी नाम, समर्थाचे ।। 
नाम समर्थाचे घेवोनि हे साचे । स्वामीसुत वाचे तरा म्हणे ।।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग १२ ।।


नामाविण नका वेळ दवडू फुका' ।
घेऊ नका धक्का', स्वामीविण ॥ 
नाम हे अमोल्य, स्वामीचे मंजूळ । नसे त्यासी तुल्य' अन्य काही ।।
कलियुगी एक नाम हे तारक ।
अंती होण्या सुख, 'स्वामी' स्मरा ॥
म्हणे स्वामीसुत दवडू नका व्यर्थ । त्वरे साधा स्वार्थ', नरदेही 



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग १३ ॥


स्वामीनामी गोडी घ्यावी ही आवडी । करा काही जोडी नामजपे || 
नामजपे कदा नसे ती आपदा' । दुरिताची' बाधा नसे अंती | 
नसे अंती कोण एका स्वामीविण । म्हणुनी चिंतन करा त्याचे ॥ 
करा त्याचे ऐसे भजन भरंवसे । तरावया खासे तेचि असे ॥ 
तेचि असे एक, नाम हे सुरेख । गाता सर्व लोक उद्धरती ॥ 
उद्धरती साच, श्रुती सांगे हेच । स्वामीसुत तेच, तुम्हां सांगे ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग १४ ॥


स्वामीचा ज्या ध्यास, मुखी नामघोष ।
तयासि सायास' दुजे नको ॥
दुजे नको तया भव तरावया । साधन हे वाया, स्वामीविण ।।
स्वामीविण काही खटपट नाही ।
ऐसी करा सोयी, तुम्ही आता ।।
तुम्ही आता बरा, स्वामीध्यास धरा । स्वामीसुत खरा मार्ग सांगे ॥


॥ श्रीस्वामीपाठ : अभंग १५ ॥


नाही स्वामीभक्ति कैची तया मुक्ति । जाईल तो अंती दीनवाणा || 
ज्याचा नामी सत्य, नाही हा भावार्थ । कुळ ते यथार्थ' बुडविले || 
यमाची त्या खरी जाचणी' ही बरी । होता कैवारी कोण असे ||
ज्याचे सत्ताबळे सर्व होय भले ।
वंदा ती पाऊले, मनोभावे ।।
स्वामीसुत म्हणे, भक्ति ही धरणे । तेणेचि वरणे' मुक्ती तुम्ही ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग १६ ।।


नसे नाव ज्यासी आणि रूप त्यासी ।
निरंजनवासी' स्वामीराया ||
परब्रह्म सगुण, आदिचे निधान'। अक्कलकोटी जाण वसतसे ।।
योगीयांचे ध्यान, जयाचें चरण ।
करिती वंदन 'देव-मुनी' ।
भक्तकैवारी स्वामी निर्धारी । स्वामीसुत करी, स्वामीपाठ ।।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग १७ ||


स्वामीपाठ करी धन्य तो संसारी । खरा निर्धारी जन्म त्याचा ॥
स्वामी घनदाट भरलासे नीट ।
कोठे नसे सूट, त्याजविणे ॥
सर्व हे व्यापून राहिले आपण । करा त्याचे ध्यान सर्व तुम्ही ॥
सुलभ तो बरा मार्ग हाचि खरा ।
'स्वामी -नाम' स्मरा अनुदिन ||
स्वामीपाठ करी, त्याची चुके फेरी । स्वामीसुत करी तेची सदा ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग १८ ॥


स्वामी हा चळेना आणिक ढळेना । कधीही वळेना, स्थिररूप ॥ 
कधीही तुटेना, कधीही फुटेना । कधीही गळेना, ब्रह्मरूप ।।
सर्व जगी पाहे, व्यापुनी तो राहे ।
स्वामीविण ठाव कोठे नसे ॥
तेच हे निर्गुण', झाले हो सगुण' । परब्रह्मपूर्ण स्वामीराज ॥ 
स्वामीसुत म्हणे अचळ' हे नाणे । भक्तीने धरणे, हेचि सुख ।।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग १९ ।।


पराहुनी परता असे माझा ताता' । भक्तिविण पाहता, हाता न ये ।। 
नव्हते नाम-रूप, धरिले स्वरूप । दंभाचा हा लोप, पाहता होय ॥
निश्चय ठेवणे, भाव हा धरणे ।
मूर्ती हीच पाहणे, निरंजनी ॥
नव्हता काही कर्ता, झाला सर्व कर्ता ।
स्वामीविण वार्ता जगी नसे ॥
नव्हता स्पर्श ज्यासी, असे स्पर्श त्यासी 
जया चरणांशी ध्याता सुख ।।
स्वामीसुत म्हणे स्वामीभक्तिविणे ।
ठायी सापडणे नव्हे कधी ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग २० ॥


स्वामी पूर्णज्योत निरंजनी राहत । तो आकारासी सत्य आला स्वये ॥ 
जो आदिपुरुष, तोचि हा सर्वेश । धरी यतिवेष', कौतुकेसी || 
जयाच्या सत्तेने सृष्टिचे मांडणे । साजे जया लेणे, कृपेचे हे । 
तयासी हो ध्याता', हरे सर्व चिंता । नुरे भव-व्यथा', कृपाबळे ।। 
'श्रीस्वामीसमर्थ' - पाठ हाचि सत्य । गाई भावे नित्य, धन्य तोचि ॥ 
ठेऊनिया चित्त, वाचावा हा स्वस्थ । तेणे मनोरथ पुरतील ॥ 
म्हणे स्वामीसुत त्रिगुण' यथार्थ । 'समर्थ' हा सत्य भजा त्यासी ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग २१ ।।


निराकार - साकार स्वामी निर्धार' ।
नसे ज्याचा पार' कदाकाळी ॥ 
निर्गुण-सगुण हाचि एक जाण । 
मुळीचे निधान' स्वामीराज ॥
नसे ज्यासी जात, नसे ज्यासी गोत ।
ऐसा हा समर्थ, आदिरूप ॥
नव्हे हा स्वेदज", नव्हे हा उद्भिज' ।
अणुरेणु-रज' व्यापक हा ।।
नव्हे हा अंडज', नव्हे हा जारज' ।
ऐसा स्वामीराज, अनादिसिद्ध" ॥
स्वामीसुत म्हणे स्वामीभक्तिविणे स्वामी हो मिळणे नव्हे कधी ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग २२ ।।


वृद्धपण जाण तैसेची तारुण्य ।
नसे बाळपण, स्वामीराया ॥
शुभ्र न पिवळा आणिक हा निळा । रंग नसे काळा, स्वामीलागी ॥
नसे काही रंग, आणिक हा संग' ।
कदाकाळी भंग नसे ज्यासी ॥
नसे हाचि पिंडी, वसे तो ब्रह्मांडी । व्यापुनी नवखंडी', वेगळाची ॥
असे हा अचल आणिक चंचल' ।
राहे सर्वकाळ ऐशा रीती ॥
दृश्य हेचि सर्व, व्यापी स्वामीराव ।
मिथ्या' 'अन्य' भाव, याजविणे ||
वेद हो निमाले, शास्त्र हे थकले ।
शेषादि श्रमले वर्णावया ||
म्हणे स्वामीसुत रूप हे अमित' । स्वामीचे हो सत्य मनी धरा ।।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग २३ ॥


सोडूनी संशय, भजा स्वामीराय । जरी व्हावी सोय, परमार्थाची'॥
ज्याची कृपा होता, द्वैताची' ही वार्ता । नुरे ती सर्वथा सत्य सत्य ॥ 
मोठे मोठे गेले सांगुनिया भले । अज्ञान ते ठेले, जैसे-तैसे ।। 
देहबुद्धी नेटे' कर्म हेचि खोटे । लावितसे काटे, जन्मांतरा ॥ 
स्वामीसुत म्हणे स्वामीभक्तिविणे । नोहे नोहे, लेणे मुक्तीचे' हे ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग २४ ॥


भक्तिभावाविण घडेना ते पुण्य । सदा राहे न्यून' त्याच अर्थी ।। 
भावाविण नोहे काही एक सोय । अंतकाळ होय गोड ऐसी ॥ 
अंती प्रेमभावे स्वामीराज पाहावे ।
मुरूनिया जावे तुम्ही तेथ ।। 
म्हणे स्वामीसुत धरूनिया पंथ । ठेवावा भावार्थ, त्याजवरी ।।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग २५ ॥


स्वामीपायी चित्त ठेऊनिया स्वस्थ । ध्याता तोचि मुक्त करील की ।। 
अन्य ह्या कल्पना, सोडाव्या त्या जाणा ।
नाही तरी प्राणा, जाचणी' ती ।।
गाता नामी सुख, भजा भजा' एक । तारक हा देख 'स्वामी' जगी ॥ 
भजने जयाच्या उद्धार जगाचा । दर्शने दोषांचा नाश करी ॥ 
म्हणे स्वामीसुत पायी ठेवा चित्त । स्वामी ध्याता मुक्त, व्हाल तुम्ही ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग २६ ॥


ज्याचा हा निश्चय दृढ तोचि होय । स्वामीचे ते पाय स्मरावया || 
नसे अंगी गर्व, क्षमेचे हे पर्व । साधियेले सर्व 'स्वामी' गाता ।। 
आशा ही समूळी होय निरमूळी' ।
स्वामीकृपा जवळी होता एक ।। होता हा ' वियोग, भवाचा हो त्याग । 
स्वामीकृपे योग ऐसा घडे ।। धरोनि भावार्थ', भजे जो समर्थ । म्हणे स्वामीसुत धन्य तोचि ।।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग २७ ॥


सत्य हा संकल्प धरूनिया, जप । करावा हो खूप, नामाचा तो ।।
तोचि धन्य जगी, नामी सुख भोगी । सदा वीतरागी', विषयधना' ।। 
जरी व्हावी गती', धरावी ही भक्ती । स्वामीकृपे वृत्ती पालटेल ।। 
भावना देहाची स्वामीरूपी साची । झाल्या, धन्य तोचि एक जगी ॥ 
सत्य संकल्पाचा कैवारी दासाचा । स्वामीसुत वाचा, सत्य बोले ।।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग २८ ॥


स्वामीचे चरण माझे हो जीवन । तारक ते जाण ह्याच युगी || 
पूर्ण सनातन, त्रिगुण निधान । हेचि ध्येय-ध्यान, देवादिकां ।। 
तिहीं सत्ता एक चालविता देख । त्याचे ते कौतुक, तोचि जाणे ।।
जगामाजी नाही दुजा कोणी पाही ।
असे एक 'साई' स्वामी माझा ॥ 
स्वामीसत्ताबळे सर्व हेचि चाले । ऐसे हे नटले, ब्रह्मरूप ॥ 
आदिज्योत 'ठेव' असे स्वामीराव । सकळांसी ठाव तया पायी ॥ 
स्वामीसुत म्हणे, माझे हेचि जिणे । स्वामीचियाविणे काही नसे ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग २९ ॥


स्वामीलागी ध्याता नसे भव-चिंता' । तयाची ही सत्ता सर्व जगी ॥ 
गाता कोणी त्याला नाही वाया गेला ।
असे हा दाखला पुराणाचा ॥
कित्येक तरले, पुढेही तरतील । भावभक्ति'बळ' धरलिया ||
स्वामीसुत म्हणे ब्रह्मीचा' हा ठसा । ठेवा भरवसा याचे पायी ॥



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ३० ॥


स्वामीविण देख नसे कोठे सुख ।
करोनी विवेक' भजा त्यासी ॥
नाही तरी वाया, जाईल ही काया । फसवील माया तुम्हांलागी | 
चालता-बोलता, साधन साधिता । करा 'स्वामी- वार्ता' तारक त्या ॥ 
स्वामीसुत म्हणे स्वामीकथेविणे । व्यर्थ की हो जिणे करू नका ।।



॥ श्रीस्वामीपाठ : अभंग ३१ ॥


घेऊनिया जिम्मा' उतरीतो विमा' । तारक हे तुम्हां 'स्वामीनाम' | 
स्वामी भजा भजा, साधा आपुले काजा ।
त्यात तजावजा करू नका ॥
नये नये अंती कोण तुम्हां साथी । तारण्या तुम्हांप्रती, स्वामीवीण ॥ 
सांगतो यवना, पारशी, हिंदुजना । भजा स्वामीराणा, मनोभावे ॥ 
स्वामी हाचि खुदा, नसे दुजा कदा । भजा त्यासी सदा, तुम्ही सर्व ॥ 
जगाचा हा देव, सर्व तीच 'ठेव'। चरणी हा भाव त्याच्या असो ॥
सर्वांच्या कल्याणा 'अवतरला' राणा | नाही त्या यातना, गाता' त्यासी ॥ 
होऊनि अनन्य धरा की चरण । 'श्रीस्वामी' निधान चित्ती ठेवा ।। 
एकतीस योग्य स्वामीचे अभंग । नको हा वियोग करू ह्यांचा || 
स्वामीपाठ बरा झाला हाचि पुरा । सदा चित्ती धरा, हाच तुम्ही ||
हाचि ‘स्वामीपाठ' स्वामीसुत पाठ' । करी, ही वहिवाट चालू ठेवा ।।

।।  श्रीस्वामीसमर्थ  ।।




Shree swami Samarth Path Shree swami Samarth Path Reviewed by General Information on सप्टेंबर १९, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.