Shree Swami Samarth
नमस्कार भक्तगनहो आज आपन स्वामींची आरती पाहनार आहोत.
!! श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती !!
जय देव जय देव, जय जय अवधूता !
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता !!
जय देव जय देव, जय जय अवधूता !! धृ !!
तुमचे दर्शन होता जाती ही पापे !
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते !
चरणी मस्तक ठेवूनी मनि समजा पुरते !
वैकुंठीचे सुख नाही या परते !!
जय देव जय देव, जय जय अवधूता !! ू !
!
सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा !
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा !
शरणागत तुज होता भय पडले काळा !
तुमचे दास करिती सेवा सोहळा !!
जय देव जय देव, जय जय अवधूता !! २ !!
मानवरुपी काया दिससी आम्हांस !
अक्कलकोटी केले यतिवेषे वास !
पुर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास !
अज्ञानी जीवास विपरीत भास !!
जय देव जय देव, जय जय अवधूता !! ३ !!
र्निगुण निर्विकार विश्वव्यापक !
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक !
अनंत रुपे धरसी करणे नाएक !
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख !!
जय देव जय देव, जय जय अवधूता !! ४ !!
घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी !
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरूची भेटी !
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी !
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी !!
जय देव जय देव, जय जय अवधूता !! ५ !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: