श्री देवीची आरती Durga Aarti

 विशेष प्रसंगी करावयाची श्री देवीची आरती


दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ।। 

वारी वारी जन्म मरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी || १|

जय देवी जय देवी जय महिषासूरमर्दिनी । सुरवर ईश्वर वरदे तारक संजिवनी ।।धृ।।

त्रिभुवनी पाहता तुज ऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे
काही ।। 

साही विवाद करता पडलो प्रवाही । ते तू भक्तालागी पावसी लवलाही ॥२॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशापासूनी सोडी तोडी भवपाशा ।। 

अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा । नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥३॥


Durga Aarti


श्री देवीची आरती Durga Aarti श्री देवीची आरती Durga Aarti Reviewed by General Information on सप्टेंबर ११, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.