Shree Swami Samarth Bhajan, Tu chuku nko ambabai तू चुकू नको अंबाबाई
आम्ही चुकलो जरी तरी काही,
तू चुकू नको अंबाबाई ||
तुझे नाव आनंदी साजे,
तुझा महिमा त्रिभुवनी गाजे ।
तुझे सगुणरूप विराज
तुला वंदिती सन्मूनि राजे ।
गुण गाती वेदशास्त्र हो ||
तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकला जरी तरी काही...
आम्ही अनाथ दीन भिकारी ।
तू समर्थ प्रभु अधिकारी ।
आम्ही पतित पातकी भारी ।
तू पावन भवसभारी ।
तू पर्वत आम्ही रज राई
तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकली जरी तरी काही...
आम्ही कुपुत्र म्हणवूनि घउ ।
तू नको कुमाता होऊ |
आम्ही विषय ढेकळे खाऊ,
तू प्रेमामृत दे खाऊ |
आम्ही रागु तू उभी राहो ||
तू चुकू नको आम्ही चुकला जरी तरी काही......
आम्ही केवळ जडमूट प्राणी ।
चैतन्य स्वरूप तू शहाणी |
फट् बोबडी आमुची वाणी ।
तू वटू नको आमुच्या वाणी ।
आम्ही रडू तू गाणे गाई ||४||
तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही...
आम्ही घातक तुजविण कष्टी
तू करी कृपामृत दृष्टी
म्हणे विष्णुदास घरी पोटी |
अपराध आमुचे कोटी |
अशी आठवण असू दे हृदयी ||5||
तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही । तू चुकू नको अंबाबाई ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: