Shree Hanuman Stotram श्री मारुती स्तोत्र
श्री मारुती स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा वजहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता। सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी। दूत वैष्णव गायका ||२||
दिनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता । भव्य सिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली बाहो। आवेशे लोटला पुढे ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कापती भये ||५||
ब्रह्मांडे माईली नेणो। आवळे दंतपंगती ॥
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा । भ्रुकुटी ताठिल्या बळे ||६||
पुच्छ ते मुरडिले माथा । किरिटी कुंडले बरी ।
सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वता ऐसा। नेटका सडपातळू ।
चपळांग पाहता मोठे। महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणे । झेपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे ||९|
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिले मागे । गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठे। मेरुमांदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे । वज्रपुच्छे करु शके ।
तयासी तुळणा कैची। ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिले डोळा । ग्रासिले सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिले शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशुवृद्धी । पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि । स्तोत्रपाठे करूनिया ||१४||
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधी समस्तही ॥
नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने ||१५||
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ॥
दृढदेहो निसंदेहो । संख्या चंद्रकळा गुणे ||१६||
रामदासी अग्रगणु । कपिकुळासि मंडणु ॥
रामरूपी अंतरात्मा । दर्शने दोष नासती ॥ १७॥
इति रामदासकृत संकटनिरसनं मारुतीस्तोत्रं संपूर्णम् ॥
॥ श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: